Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 1 जानेवारी पासून कोरोन लस, कशी कराल नोंदणी जाणून घ्या प्रकिया

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 1 जानेवारी पासून कोरोन लस, कशी कराल नोंदणी जाणून घ्या प्रकिया

मित्राला शेअर करा

देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार हे सरकारने जाहीर केले आहे. यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी करता येणार आहे. COWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर. एस शर्मा म्हणाले की, यासाठी आपण Cowin ॲपवर नोंदणी करू शकता.

देशात सध्या 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाच्या वॅक्सीनला मान्यता देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यापेक्षा कमी वयातील मुलांच्या वॅक्सिनेशन साठी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले की नोंदणीसाठी 10 वी ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसल्यास. लस नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.

1 सर्व प्रथम Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.किंवा

https://www.cowin.gov.in/

या वेबसाईटवर नोंदणी करा.

2 आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.

3 आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.

4 सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

5 आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.

6 लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रेफरन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.

7 त्याचप्रमाणे, आपण आपल्या Cowin लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.म्हणजेच पालकाच्या मोबाईलवरून मुलांची नोंदणी करता येईल.