बार्शी लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या वतीने बार्शी शहरात ५ हजार वृक्षारोपण चळवळीचा भव्य शुभारंभ होणार असून शहराच्या विविध भागात दहा ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनचे अध्यक्ष महावीर कदम यांनी दिली.
रविवार दि ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कुडूवाडी रोड ढगे मळा येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कदम म्हणाले, आपला देश आणि जगासमोर वाढते तापमान हे सर्वात गंभीर संकट आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यासाठी व पर्जन्यमानासाठी वनीकरण अत्यावश्यक आहे.
त्यामुळे आम्ही लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या माध्यमातून या चळवळीला शहराच्या कासारवाडी रोड, उपळाई रोड, अलिपूर रोड, रेल्वे स्टेशन रोड, जामगाव रोड, आगळगाव रोड, धसपिंपळगाव रोड, परांडा रोड, कुर्डूवाडी रोड, इत्यादी भागात वृक्षारोपण करुन पाठबळ देणार आहोत. मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय नाना राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करत आहोत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर के क्लबचे अध्यक्ष गौतम कांकरिया, डॉ. मुकुंद तांबारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रोपण केलेल्या वृक्षांची आगामी काळात योग्य निगराणी करून त्यांचे संवर्धन करणार आहोत. तसेच या ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून शहर हिरवेगार मनोहारी दिसावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. यावेळी क्लबचे सचिव हेमंत जमदाडे, खजिनदार किरण आवटे, ऑक्सिजन पार्क क्रमांक – एकचे प्रकल्प प्रमुख वासुदेव ढगे, अमित कटारिया, डॉ सागर हाजगुडे आदी या वेळी उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न