Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > राहुल भड यांना कार्यगौरव पुरस्कार

राहुल भड यांना कार्यगौरव पुरस्कार

मित्राला शेअर करा

तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमचे संस्थापक राहुल भड यांना सातत्यपूर्ण साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळ उदगीर या संस्थेच्या वतीने कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्हि.पी. पवार, ईशान संगमनेरकर, अनंत कदम, राजपाल पाटील, तुळशीदास बिरादार, आनंद बिरादार, रणजीत पवार, प्रभू जाचक, राजेंद्र सगर, देवेंद्र गावंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत

सन्मानपत्र, शाल, पुस्तक भेट देऊन राहुल भड यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गौडगाव सारख्या ग्रामीण भागात राहून वृद्धाश्रमाच्या माध्यमातून अनेकांना सहारा देण्याची काम करणारे तसेच शेतकरी, शेतमजूर तरुणांच्या मध्ये व्यसनमुक्ती रुजवणारे, पुस्तकाची चळवळ गतिमान करणारे, संस्था शाळेंना पुस्तक रुपी भेट देऊन ज्ञानाचा जागर करणारे राहुल भड यांना त्यांच्या या कार्याबद्दल गौरवण्यात आले. भड यांना यापूर्वीही विविध संघटना संस्थेच्या माध्यमातून १४ पुरस्कार मिळाले आहेत.