Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > श्री. शि. शि. प्र. मंडळ निवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शीच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

श्री. शि. शि. प्र. मंडळ निवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शीच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

श्री. शि. शि. प्र. मंडळ निवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शीच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न
मित्राला शेअर करा

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल बार्शी व सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे शुक्रवारी दिनांक 19 रोजी सेवानिवृत्त कर्मचारी सदस्य व त्यांच्या पत्नी या दोघांसाठीही मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री. पी. टी पाटील यांनी केले. या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल बार्शी येथील मेडिकल सुप्रीडेंट व तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शकांचा सत्कार सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या आरोग्य शिबिराचे अध्यक्षस्थान मा. डाॅ. बी. वाय यादव यादव अध्यक्ष शि. शि. प्र. मं बार्शी यांनी भूषविले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे यांनी केले. शिबिरासाठी मा. डाॅ. रामचंद्र जगताप, डॉ. आदित्य साखरे, डॉ. किशोर गोडगे न्यूरो सर्जन, डॉ. महेश देवकते मनोरुग्ण तज्ञ, डॉ. धीरज जाधव मधुमेह तज्ञ व डॉ. अभिजित साळुंखे अस्थी रोग तज्ञ या सर्वांनी आरोग्यविषयक विविध समस्या, औषधोपचार, घ्यावयाची काळजी, हॉस्पिटलमधील अद्यावत सुविधा यावर पॉवर पॉईंट स्लाइड शो च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिबिराचा 110 सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी नातेवाईकांनी लाभ घेतला. हे आरोग्य शिबीर पार पाडण्यासाठी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व स्टाफ अणि सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदे एन.एस यांनी तर आभार प्रदर्शन देशमुख व्ही.जे.यांनी केले