Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > पूर्ण एफआरपी न देणारे सोलापूर जिल्ह्य़ातील 13 कारखाने, पहा लाल यादी

पूर्ण एफआरपी न देणारे सोलापूर जिल्ह्य़ातील 13 कारखाने, पहा लाल यादी

शेतकऱ्यांचा एक रुपया ही कारखान्याने ठेऊ नये असा जरी कायदा असला तरी अद्याप ही राज्यातील अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे देणे आहे.
मित्राला शेअर करा

शेतकऱ्यांच्या हिताच्‍या दृष्‍टीने जे साखर कारखाने एफआरपी ची रक्‍कम पूर्णपने आदा करीत नाहीत अश्या कारखाण्‍यांची यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.

यंदाच्‍या गाळप हंगामात राज्यातील ‍किती साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे अदा केले त्यांची यादी साखर आयुक्ता‍तांनी जाहीर केली असून, सोलापूर जिल्‍हयातील, १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या कारखान्‍यांच्या लाल यादी मध्‍ये दाखवले आहेत

साखर कारखान्याना आशी दिली जाते ओळख
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबाची महितीही थेट साखरकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केली अहे. कायद्याप्रमाणे 100% FRP अदा करणाऱ्या कारखान्यांना यादीमध्ये हिरव्या रांगणे दर्शविण्यात आले आहे. 80 % एफआरपी दिलेले कारखाने केशरी रंगात तर 60 टक्के frp देणारे कारखाने लाल रंग दर्शविण्यात आली आहे आहेत.

कुठे प्रसिद्ध करण्यात आली आहे यादी ?
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही यादी व इतर महिती साखर आयुक्तालयाच्या खालील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://sugar.maharashtra.gov.in

सोलापूर जिल्ह्यतील लाल यादित समावेश असणारे कारखाने

लोकनेते कारखाना अनगर
औदुंबर रा पाटील कारखाना आष्टी
युटोपियन शुगर मंगळवेढा
सिद्धनाथ शुगर तिर्‍हे
सिद्धेश्वर कारखाना कुमठे
भैरवनाथ शुगर लवंगी
जयहिंद शुगर आचेगाव
ओमकार चांदापुरी
भैरवनाथ शुगर आलेगाव
संत दामाजी मंगळवेढा
इंद्रेश्वर शुगर बार्शी
भैरवनाथ शुगर विहाळ
जकराया शुगर मोहोळ