Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > गणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

गणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

गणेश कदम सर यांना निवार्ण फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
मित्राला शेअर करा

बार्शी ३० : निर्वाण फाउंडेशन नाशिक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पुरस्कार देण्यात आला.

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था बार्शी व भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथील शिक्षक गणेश नारायण कदम यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्यात कार्य पाहून त्यांना निर्वाण फाउंडेशन नाशिक यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला.

या पुरस्कारासाठी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री संतोष गुळमिरे यांनी व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री राहुल वाणी व सर्व पदाधिकारी यांनी देखील अभिनंदन केले.