सध्या ते छत्तीसगड येथील रायपूर या जिल्ह्यात कार्यरत होते. मात्र दोन दिवसाखाली झालेल्या नक्षलवादग्रस्त रायपूर भागात नक्षलवाद्यांसोबत सोबत त्यांची चकमक उडाली होती. या चकमकीमध्ये जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते रायपुर येथे उपचार घेत असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

आज अंत्यसंस्कार
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील जवान छत्तीसगड येथे नक्षल्यांची जवान रामेश्वर काकडे यांना दोन हात करताना वीर मरण आले. 8: 30 वाजता अंत्यविधी गौडगाव येथे केला जाणार आहे.

रामेश्वर काकडे यांचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वडील, आई व दोन बहिणी असा परिवार आहे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पुणे येथे रामेश्वर काकडे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरच्या साह्याने आणण्यात आले व गौडगाव या मूळ गावी रवाना झाले असून त्यांच्यावर संध्याकाळी 8:30 सुमारास जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती गावातील त्यांच्या मित्रांनी दिली आहे. त्या ठिकाणी प्रशासनामार्फत अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

रामेश्वर वैजनाथ काकडे यांचे शालेय शिक्षण मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगांव येथे झाले आहे.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत