या पुर्वी, PM Kisan Sanman Nidhi योजनेच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना CSC केंद्रावर, ऑनलाईन सेंटरवर जावे लागत होते.
मात्र यापुढे शेतकऱ्यांना या योजनेची नोंदणी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातूनही करता येणार आहे.
पहा काय आहे केंद्र सरकारची नवी योजना
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना घरबसल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयी माहिती मिळावी तसेच नोंदणी करता यावी म्हणून GOI हे मोबाईल ॲप सुरु केले आहे.
या ॲपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी करता येणार आहे , तसेच या ॲपच्या माध्यमातून खात्यावरील जमा रकमेची माहिती मिळणार आहे त्यामुळे जमा रकमेची चौकशी करण्यासाठी कोठे जावे लागणार नाही.
हे ॲप शेतकऱ्यांना खालील लिंक वरती क्लिक करून डायरेक्ट आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan
व प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येणार आहे.
GOI अँप मध्ये रेजिस्टर करण्यासाठी शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड केल्यानंतर ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल
विचारलेली माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करावे लागणार आहे नंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
तसेच या अँप विषयी अधिक माहिती पंतप्रधान किसानच्या 155261 या हेल्पलाइन नंबरवर मिळविता येईल
आता शेतकऱ्यांना घरबसल्या PM Kisan Sanman Nidhi योजनेसाठी नोंदणी करता येईल हि माहिती आपल्यासाठी व आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्वाची आहे इतरांना देखील शेअर करा.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट