बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील कृषी तंत्र विद्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
पंचायत राज ट्रेनिंग सेंटर, गौडगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित कृषी तंत्र विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यवर्ष निमित्ताने शेतकरी मेळावा संपन्न झाला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै. कर्मवीर लोहोकरे गुरुजी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा शेतकरी मेळावा संस्था अध्यक्ष विनायक गरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्राचार्य जे. डी. जाधव, नवनाथ कसपटे, जे. बी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, पौष्टिक तृणधान्य, शेतीचे महत्त्व व शाश्वत शेती या विषयावर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्था अध्यक्ष विनायक गरड, सचिव पंडितराव लोहोकरे, संचालक अनिल गरड व अरुण भड तसेच अनिता शिंदे, सरपंच स्वाती पैकेकर,जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले तर आभार रणजित गरड यांनी मानले.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न