सोलापूर – शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अँन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. अँन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 23, 24 व 25 में 2025 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेसाठी परिक्षार्थीकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2025 साठी
https://gdca.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 07 मार्च 2025, रात्री 8.00 वाजेपर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. 13 मार्च 2025 रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवरुन संपर्क साधावा, कार्यालयीन दुरध्वनी क्र. 0217-2629749 आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, डॉ. प्रगती बगल यांनी कळविले आहे.
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा