तेर प्रतिनिधी ( हरी खोटे ) :- श्री संत गोरोबा काका मंदिर परिसरात प्रस्तावित असलेली महाद्वार कमानीची जागा बदलण्याची मागणी तेर ग्रामस्थांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे विशेष म्हणजे महाद्वार कमानीची जागा बदलण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काकांच्या मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या महाद्वार कमानीची जागा गावाला पाणीपुरवठा चालू असलेल्या पाण्याची टाकी पाडून त्या ठिकाणी जे महाद्वार कमान बांधकामांचे लोकेशन आहे ते बरोबर नाही ती कमान रोड लगत होणे अपेक्षित आहे अशी तेर ग्रामस्थांची मागणी आहे त्यामुळे आगामी काळात महाद्वार कमानीचे जे काम चालू होणार आहे ते काम थांबवणे व रोड लगत कमानीचे बांधकाम करावे तसे न केल्या तेर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करतील तसेच जागा नवीन किंवा पुढे जागा प्रस्ताविक करायची असेल तर तेर ग्रामस्थांना विश्वासात घेत तारीख व वेळ देऊन श्री संत गोरोबा काका मंदिरांत तेर ग्रामस्थांची बैठक घेऊन महाद्वार कमानीची निश्चित करण्यात यावी
यापूर्वीसुद्धा जे शौचालय झाले ते सुद्धा पूर्व बाजूला नसते असे वास्तुशास्त्र सांगते पण आपण मंदिर परिसरात पूर्व बाजूस केले आहे त्यामुळे जे कामे चालू ते थांबवावे तसे न केल्यास तेर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील त्याला आपण प्रशासक जबाबदार असेल या निवेदनावर महादेव खटावकर, ईतीश चौगुले, अमोल थोडसरे, आदिंसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप