बार्शी टेक्सस्टाईल मिल चालु करण्यासाठी व देशातील एन टी सी मिल करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सचिनभाऊ आहिर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
बार्शी :— दि १६/६/२०२२ रोजी रा.मि.मजदुर संघ ( मूबई) अध्यक्ष सचिनभाऊ आहिर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सचिनभाऊ आहीर यांनी मुंबई, बार्शी, अचलपुर तसेच देशातील एन टी सी गिरण्या बंद झाल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीमूळे २०२०पासुन मिल बंद आहेत.

कामगाराना ५०% पगार दिला जातोय. तो वेळेवर मिळत नाही. त्याचबरोबर मिलच्या चाळीमध्ये राहत असलेल्या कामगाराच्या समस्या देखील सचिनभाऊ यांनी सांगीतल्या. मिल चालु करण्यासाठी आम्ही सरकार सोबत कधीही चर्चा करण्यास तयार आहोत. यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी आपले म्हणणे आहे ते श्री पियुष गोयलजी व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. त्यानंतर अचलपुरचे मिलचे अध्यक्ष राजेशजी खोलापुरे यांनी ग्रामीण भागातीय अचलपुर व बार्शी या भागातील मिल चालू करण्यासाठी विनंती केली. अचलपुर मिल ही फायदेमध्ये चालु आहे तरी ती बंद आहे ती आपण ती चालु करावी यात लक्ष घालावे अशी विनंती केली.
हे निवेदन देण्यासाठी सचिनभाऊ आहिर ( रा.मि.मजदुर संघ मुबंई अध्यक्ष), गोविंदरावजी मोहीते, निवृत्ती देसाई, सुनिल बोरकर, गंगाराम गावडे, शिवाजी काळे, आण्णा शिर्तकर, बार्शी टेक्सस्टाईल मिलचे जनरल सेक्रेटरी नागनाथ सोनवणे, अध्यक्ष अभिजीत चव्हाण, अचलपुरचे अध्यक्ष राजेश खोलापुरे, सेक्रेटरी रामसुंदर बुंदेलजी, पकंज गोखले, समिर शेख इ, उपस्थित होते.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन