मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्लोबल वार्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे.
आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र बनवायचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राम कदम, आमदार दिलीप लांडे यांच्यासह द ॲड्रेस सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान सुरू केले आहे. या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सीजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करण्यात सहभाग घ्यावा. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बनफॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा.
ग्लोबलवॉर्मिंग चा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.
प्रदूषणमुक्त राज्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून सुमारे २१ लाख हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दीष्ट्य ठेवले आहे मुख्यमंत्री
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न