Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…

जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…

जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश
मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्हा कब बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा श्रीपुर. येथील चंद्रशेखर विद्यालय या ठिकाणी दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न झाला या जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयातील स्काऊट आणि गाईड या पथकाने दैतित्यामान कामगिरी करत सहा पारितोषिक पटकावले.

  • वैयक्तिक -तीन प्रकारांमध्ये व सांघिक -तीन प्रकारांमध्ये पारितोषिक पटकावले यामध्ये
  • पोस्टर स्पर्धा: संस्कार योगेश उपळकर.
  • वेशभूषा स्पर्धा : समर्थ हनुमंत सातनाक व मृदुला गणेश गुरव.
  • संचलन स्पर्धा :(सांघिक)
  • तंबू सजावट (सांघिक) शेकोटी कार्यक्रम (सांघिक).
    अशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र विद्यालयातील स्काऊट व गाईड या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर अडीच हजार विद्यार्थ्यांमध्ये पारितोषिक पटकावले.

सदर पारितोषिक माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कादर शेख साहेब श्रीमती स्वाती हवेली मॅडम उपशिक्षणाधिकारी माध्य. विभाग; स्काऊट जिल्हा संघटक श्रीधर मोरे साहेब व गाईड जिल्हा संघटक अनुसया शिरसाठ मॅडम तसेच जिल्हा स्तरातील मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शोकटी कार्यक्रम शोभायात्रा सेल्फी पॉईंट बिनभांडेचा स्वयंपाक प्रश्नमंजुषा धावणे स्पर्धा चित्रकला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळवले आहे या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर योगेश उपळकर तसेच गाईड कॅप्टन कॅप्टन श्रीमती लोमटे मॅडम, श्री. अतुल नलगे सर श्रीमती चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संस्था अध्यक्ष माननीय बी. वाय. यादव साहेब जनरल सेक्रेटरी माननीय श्री. पी. टी पाटील साहेब संस्था उपाध्यक्ष माननीय. श्री. नंदनजी जगदाळे साहेब संस्था खजिनदार व सांस्कृतिक प्रमुख माननीय शितोळेबापू तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका धावणे के. डी. मॅडम उपमुख्याध्यापक सपताळे सर पर्यवेक्षक श्री. महामुनी सर पर्यवेक्षिका साठे मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.