Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकर्‍यांना मिळते दोन लाख मदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकर्‍यांना मिळते दोन लाख मदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकर्‍यांना मिळते दोन लाख मदत
मित्राला शेअर करा

पूर्वी असणार्‍या या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून याआधी सरकार सर्व शेतकर्‍यांना विमा कंपनीच्या माध्यमातून सरकारकडून अपघातग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळत असे परंतु आता राज्यशासनाने या योजनेत मोठा बदल केला असून सानुग्रह अनुदानाच्या माध्यामातून अपघातग्रस्त शेतकर्‍यांना दोन लाख
व अपघातग्रस्त शेतकऱ्यांना एक लाखाची आर्थिक मदत मिळणार आहे.

तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच इतर तरतुदी या योजनेत मिळणार आहेत व जमीन नावावर नसलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पहा कोणते आहेत १२ अपघात

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू होणे, विषबाधा होणे, विजेचा धक्का लागून मृत्यू होणे, वीज पडून मृत्यू होणे, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प चावून मृत्यू होणे, नक्षलवाद्यांकडून झालेला हल्ला,

त्याचबरोबर जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, खून, यासर्व अपघातांसाठी राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

परंतु ज्यांच्या नावावर जमीन नाही आणि ज्यांचे नाव सातबारावर सुद्धा नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील कुठल्याही एका व्यक्तीला अर्ज करता येणार आहे. मात्र अर्जदाराचे किमान वय १० वर्षे असावे आणि जास्तीत जास्त ७५ वर्ष असावे.