Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम

गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम

गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी :- हरी खोटे
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता धाराशिव येथील राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काकांच्या दिनांक २३ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या वार्षिक समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या प्रशासकीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे यांनी सांगितले. टाळ मृदंगाच्या तालावर हरिपाठ कीर्तन भजन प्रवचनासह हरिजागराचा घुमणार गजर असून राज्यभरातील भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळा चैत्र वद्य १० दशमी ते चैत्र १४ चतुर्दशी म्हणजेच दिनांक २३ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.

दरम्यान या उत्सवादरम्यान भजन कीर्तन प्रवचन पालखी मिरवणूक गोपाळकाला असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक २३ रोजी महाराष्ट्रातील विविध संत महंतांच्या शेकडो वारकरी दिंड्याचे तेर नगरीत आगमन व परंपरेप्रमाणे भजन प्रवचन कीर्तन समाधी उत्सवास प्रारंभ रात्री हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे कीर्तन सेवा, दिनांक २४ रोजी वरुथिनी एकादशीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते महापुजा आरती झाल्यानंतर संत गोरोबा काकांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज देहुकर यांची कीर्तन सेवा काळेगाव व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरी जागर दिनांक २५ रोजी द्वादशी निमित्त तेरकराची पारंपरिक कीर्तन सेवा व परिसरातील सर्व वारकऱ्यांचा सामुदायिक हरिपाठ हभप शंकर महाराज धोबडे यांची कीर्तन सेवा व हरी जागर दिनांक २६ रोजी हभप त्रयोदशीला गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप दत्तात्रय महाराज आंबीरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर गुलाल व पुष्प उधळण तर रात्री कान्होबा महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा व पारंपरिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरी जागराचा कार्यक्रम होणार आहे दिनांक २७ रोजी पहाटेच्या सुमारास गोरोबा काकांच्या पालखीची छबीना मिरवणूक तसेच भगवान श्री. लक्ष्मी नृसिंह मंदिरात काल्याचे हरी कीर्तन गोपाळकाला व दिंडी विसर्जन तसेच कुस्तीचा कार्यक्रम व त्यानंतर गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्याची सांगता होणार तसेच बुधवार दिनांक ३० रोजी अक्षयतृतीया दिवशी संत गोरोबा काकांच्या वार्षिक यात्रा उत्सवांची सांगता होणार आहे त्यामुळे तेरसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, निरीक्षक अतुल नळणीकर, व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.

गोरोबा काकांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसह वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सुलभ दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे तसेच मंदिरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरांसह परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्यामुळे सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांसह नागरिकांनी यात्रा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंदिर ट्रस्टसह प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीच्या प्रशासकीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे यांनी केले