Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश

राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश

मित्राला शेअर करा

बार्शी, दि. १३: राज्यस्तरीय शालेय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी व जिल्हा म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी परभणी येथे करण्यात आले. या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत म्युझिकल चेअर स्केटिंग व स्केटिंग स्पीड रोलर प्रकारात १९ वर्षांखालील गटात बहुमूल्य पदके मिळवली. या कामगिरीमुळे निवडक खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशस्वी खेळाडूंना श्रीशा स्केटिंग क्लब, बार्शीच्या सौ. प्रियंका येडलवार यांचे मार्गदर्शन लाभले.

म्युझिकल चेअर स्केटिंग विजेते (१९ वर्ष वयोगट):
१) प्रसाद प्रमोद मांडे – प्रथम क्रमांक
२) शिवराज अविनाश साळुंखे – प्रथम क्रमांक
३) पृथ्वीराज हेमंत जाधव – प्रथम क्रमांक
४) श्रीशा जितेश येडलवार – प्रथम क्रमांक
५) कृष्णा आनंद ढाळे – द्वितीय क्रमांक
६) कार्तिकेय रवींद्र पवार – द्वितीय क्रमांक
७) प्रसाद पांडुरंग शिंदे – द्वितीय क्रमांक

१६ वी राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्पर्धा २०२५
ही स्पर्धा म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व म्युझिकल चेअर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीत पार पडली. वय व वजन गटानुसार ८, ११, १४, १७ व १९ वर्ष या गटांमध्ये खेळ घेण्यात आले. या स्पर्धेतही बार्शीच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले.

स्केटिंग स्पीड रेस प्रकारातील विजेते:

१) अथर्व अनंत केसकर – सुवर्णपदक
२) प्रसाद पांडुरंग शिंदे – सुवर्णपदक
३) सर्वेश शिवशंकर उदबळे – सुवर्णपदक
४) सोहम दिपक सावंत – सुवर्णपदक
५) कार्तिकेय रवींद्र पवार – सुवर्णपदक
६) द्वारकेश रुषिकेश झारेगावकर – सुवर्णपदक
७) प्रसाद प्रमोद मांडे – सुवर्णपदक
८) पृथ्वीराज हेमंत जाधव – सुवर्णपदक
९) स्वरूप वैभव पोळ – रौप्य पदक
१०) शिवराज अविनाश साळुंखे – रौप्य पदक
११) आरव निरंजन गांधी – कांस्य पदक
१२) कृष्णा आनंद ढाळे – कांस्य पदक

म्युझिकल चेअर स्केटिंग प्रकारातील विजेते:

१) अथर्व अनंत केसकर – सुवर्णपदक
२) प्रसाद पांडुरंग शिंदे – सुवर्णपदक
३) सर्वेश शिवशंकर उदबळे – सुवर्णपदक
४) कार्तिकेय रवींद्र पवार – सुवर्णपदक
५) द्वारकेश रुषिकेश झारेगावकर – सुवर्णपदक
६) शिवराज अविनाश साळुंखे – सुवर्णपदक
७) कृष्णा आनंद ढाळे – सुवर्णपदक
८) आरव निरंजन गांधी – रौप्य पदक
९) सोहम दिपक सावंत – रौप्य पदक
१०) प्रसाद प्रमोद मांडे – रौप्य पदक
११) पृथ्वीराज हेमंत जाधव – रौप्य पदक
१२) स्वरूप वैभव पोळ – कांस्य पदक

या स्पर्धेच्या वेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र म्युझिकल चेअर स्केटिंग संघटनेचे चीफ पॅटर्न श्री. संतोष कठाळे, गीता साखरे मॅडम, उपाध्यक्ष श्री. प्रशांत नाईक, सचिव श्री. तुकाराम ठोंबरे, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मी मगर, विठ्ठल पोचणारे सर व शिक्षणाधिकारी गणेशराव शिंदे यांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील सात विभागांतील एकूण ४८० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या यशस्वी खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी गोवा येथे ३ व ४ मे २०२५ रोजी होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे.