( तेर प्रतिनिधी :- हरी खोटे ) प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता उस्मानाबाद येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांच्या वार्षिक यात्रा महोत्सवांची मंगळवार दिनांक ३ मे रोजी अक्षयतृतीयेला मोठ्या उत्साहात सांगता झाली यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी अक्षयतृतीयेदिनी गोरोबा काकांच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मंदिरांसह परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता
कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण देशासह राज्यात थैमान घातले होते त्यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध निर्बंध लावल्याने राज्यभरातील विविध देवदेवतांसह संतमहताच्या लहान मोठे यात्रा महोत्सव गेल्या दोन वर्षांपासून बंदच होते सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने केंद्र व राज्य सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे तेर ता उस्मानाबाद येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा वार्षिक यात्रा महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे यात्रा महोत्सवा दरम्यान गोरोबा काकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसह नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी पी बी भोसले, ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ नाईकवाडी उपसरपंच रविराज चौगुले ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी व ग्राप सदस्य, पोलिस प्रशासन उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग , महावितरण कंपनी, एसटी महामंडळ, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आदिनी भाविक भक्तांसह नागरिकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी तगडे नियोजन करत गोरोबा काकांचा वार्षिक यात्रा महोत्सव उत्साहात पार पाडला त्यामुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे भाविक भक्तांसह नागरिकांतून कौतुक होत आहे विशेष म्हणजे यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासह अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश. यांच्या मार्गदर्शनाखाली व ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या देखरेखीखाली बीट अंमलदार राम तरटे यांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच यात्रा कालावधीत गोरोबा काकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी दिंड्यासह भाविक भक्तांसह नागरिकांना व्यावसायीकाना पाणी पुरवठ्यासह इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी व यात्रा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांच्यासह ग्राप सदस्यांनी परिश्रम घेतले तर गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी पी बी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी गोरोबा काकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसह नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये यासाठी तगडे नियोजन केले होते त्यामुळे मंदिर ट्रस्टचे भाविक भक्तांसह नागरिकांतून कौतुक केले जात आहे
व्यावसायिकातून समाधान :- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विविध देवदेवतांसह संतमहताचे लहान मोठ्या यात्रा बंद असल्याने हातांवर पोट असणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती परंतु यंदा विविध देवदेवतांसह संतमहताचे लहान मोठे यात्रा महोत्सव होत असल्याने व्यावसायिकामधून समाधान व्यक्त केले जात आहे
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान