ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शीमधील पदाधिकारी आणि सदस्यांनी केला बार्शीतील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांचा झाड देवून केला वाढदिवस साजरा
बार्शी शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा.श्री प्रवीण शिरसाट यांचा वाढदिवस हार गुच्छ न देता एक वेगळा उपक्रम म्हणुन पोलिस अधिकारी शिरसाट याना झाडाचे रोपटे देवून ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी मधील पदाधिकारी व सदस्य यांनी साजरा केला. यावेळी श्री शिरसाट बोलताना म्हणाले की मला झाडे लावायला आवडतात अणि आपण झाड देवून माझा वाढदिवस लक्षात राहील असा केला त्याबद्दल ओन्ली समाज बहुउद्देशीय संस्थेतील पदाधिकारी सदस्य यांचे आभार मानले या प्रसंगी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी सांगीतले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत