▪︎ मानाच्या कुस्तीत तेरचा सोमनाथ माने विजयी
▪︎ कुस्तीच्या आखाड्यात उस्मानाबादसह परजिल्ह्यातील २८० मल्लाचा सहभाग
▪︎ ५० रुपयांपासून ते २१ हजारांपर्यंत रंगला आखाड्यात कुस्त्याचा डाव
तेर प्रतिनिधी :- प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता उस्मानाबाद येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांच्या ७०५ व्या वार्षिक समाधी सोहळ्यानिमित्त तेर ग्रामपंचायत व संत गोरोबाकाका व शिव मंदिर ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात तेर येथील शिवछत्रपती तालीम संघाच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला तर शिवछत्रपती तालीम संघाच्याच सोमनाथ माने यांने २१ हजार रुपयांच्या मानाच्या कुस्तीत तुळजापूरच्या विजय मोटे याला चितपट करत विजय मिळवला
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा वार्षिक समाधी सोहळा दि २५ ते २९ एप्रिल या कालावधीत पार पडला यावेळी तेर ग्रामपंचायत व गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या दि.२९ रोजी कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेेेताजी पाटील भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंंहराजे निंंबाळकर , जिपचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी , गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी , प्रदीप भोसले , सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच रविराज चौगुले आदिच्या उपस्थित कुुस्ती लावून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , रतन नाईकवाडी , बाळासाहेब कदम , अमोल थोडसरे , बापू नाईकवाडी, श्रीमंत तेरकर नानासाहेब गायके, भागवत भक्ते , मारुती इंगळे आदिंसह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते यावेळी या स्पर्धेत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास २८० मल्लांनी सहभाग नोंदविला होता दरम्यान कुस्तीच्या आखाड्यातील शेवटची 21 हजार रुपयांची मानाची कुस्ती तुळजापूर तालुक्यातील वाडीबामणीचा मल्ल पैलवान विजय मोटे व तेरच्या शिवछत्रपती तालीम संघाचा मल्ल पैलवान सोमनाथ माने यांच्यात झाली
यात पैलवान सोमनाथ माने यांने पैलवान विजय मोटे यास चितपट करत मानाच्या कुस्तीवर तेरच्या सोमनाथ माने यांने नाव कोरले यावेळी कुस्तीप्रेमी नागरिकांनी हल्लगीच्या तालावर जल्लोष केला विशेष म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात सहभागी झालेल्या मल्लांनी विविध प्रकारचे एकाचढीत एक डावपेच टाकीत कुस्तीपटूनी चित्तथरारक कुस्त्या गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीप्रेमी नागरिकांनी अनुभवल्या गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या महाभयंकर महामारीमुळे गोरोबा काकांचा वार्षिक समाधी सोहळा झाला नाही त्यामुळे यावर्षी काकाचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात भरला असून लाखो रूपयाची उलाढाल झाली आहे विशेष म्हणजे दोन वर्षानंतर कुस्तीचा आखाडा रंगला त्यामुळे यात्रेत रंगत भरली होती या आखाड्यात लोहारा , लातूर औसा , रामेश्वर , तुळजापूर , पुणे यासह तेर परिसरातील २८० लहान मोठ्या पैहिलवानानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता दरम्यान आखाड्यात पंच म्हणून
पै. भागवत भक्ते , पै.गोविंद घारगे , पै. मारुती इंगळे , शामराव गायके , बालाजी पांढरे , संजय जाधव , नानासाहेब भक्ते , राजेंद्र पसारे , नवनाथ पसारे , श्रीमंत तेरकर यांनी पंच म्हणून काम पाहिले यावेळी कुस्तीचा आखाडा यशस्वी करण्यासाठी सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच रविराज चौगुले , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , मंदिराचे प्रशासकीय अधिकारी पी बी भोसले , ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गाढे , बिट अंमलदार राम तरटे , यांच्यासह ग्राप सदस्य , कर्मचारी , शिवछत्रपती तालीम संघाचे अध्यक्ष नानासाहेब भक्ते , शामराव गायके , संजय जाधव , राजेंद्र पसारे , यांनी परिश्रम घेतले
तेरच्या शिवछत्रपती तालीम संघाच्या मल्लांचा दबदबा :– गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात तेर ता उस्मानाबाद येथील शिवछत्रपती तालीम संघातील नवनाथ पसारे , पवन माने , पृथ्वीराज पुजारी , नागेश ठोंबरे , राहूल शिंदे , बुबा देवकर , अजय गायके , विजय गायके , अयान शेख , गणेश भक्ते , पवन भक्ते , शंभू जाधव, तुकाराम पांढरे , ललित बंडे , मनोज कोळेकर , विजय पवार आदी मल्लांनी कुस्तीच्या आखाड्यात उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न