बार्शी : तालुक्यातील पुनर्वसित महागांव व तांदुळवाडी या गांवच्या प्रलंबित व अपूर्ण नागरी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी दि. २५ एप्रिल रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार सुनील शेरखाने व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.
सदर बैठकीत प्रलंबित व अपूर्ण पुनर्वसित सोयी सुविधांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासकीय व गावपातळीवरील अडचणी सामंजस्यपणे दूर करून त्या कामांना गती देण्यासाठी, बुधवार दि. २७ एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या पुनर्वसित गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले होते.
त्या अनुषंगाने आ. राजेंद्र राऊत यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार सुनील शेरखाने, भूमापन अधिकारी नरेंद्र झांबरे, लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एस.शिंदे यांच्या समवेत पुनर्वसित तांदुळवाडी व महागांव या गावांस प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या अपूर्ण व प्रलंबित नागरी सोयी सुविधांची माहिती घेऊन, त्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे.
या भेटीवेळी तांदुळवाडी व महागांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’