Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी, सोपी पद्धत

आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी, सोपी पद्धत

सोपी पद्धत, पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरआता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे
मित्राला शेअर करा

तसे तुम्हाला माहिती असेल, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य केले आहे वारंवार मुदतवाढ देण्यात येऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण केलेली नाही.

बर्‍याच शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ईकेवायसी करून घेतली आहे.

मात्र आता पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे

अशी करा ई-केवायसी

मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम खालील

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

https://pmkisan.gov.in

या शासनाच्या अधिकृत
वेबसाईटवर जा आणि e-KYC पर्याय आहे तिथे आधार नंबर टाका.

यामध्ये आपला आधार क्रमांक टाका. त्यानंतर उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरा त्यांनतर सर्च करा

नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून Get OTP वर क्लिक करून मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP नंबर टाकून Submit For Auth यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला e-KYC is Success असा SMS येईल

आता घरबसल्या e-KYC करता येणार हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खूप महत्वाची आहे आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx