माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रमी टप्पा पार केला असून २५ लाख मे. टन किंवा त्याच्या जवळपास ऊस गाळप केले जाईल, असा अंदाज आहे.
कारखान्याकडे नोंदल्या गेलेल्या एकूण ऊसापैकी अद्याप दीड ते दोन लाख मे. टन ऊस गळीतासाठी शेतात उभा आहे, परंतु शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा धीर सोडू नये कारण ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा कार्यरत आहे व संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!