दि ७ मे : वैशाख बुध्द पौर्णिमा निमीत्त भव्य १० दिवसीय श्रामनेर शिबीर बार्शी शहरात प्रथमच ७ मे ते १६ मे २०२२ या कालावधीत श्रामनेर शिबिराचे आयोजन केले आहे. १६ मे ला बुद्धजयंती दिवशी समारोप होणार आहे.

या शिबिरासाठी नालंदा स्तूप, बुद्धीजम व रिसर्च ट्रस्टच्या वतीने जयंती उत्सव मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दि ७ मे २०२२ या दिवशी शिबाराला सुरुवात झाली असून हे शिबीर दिलीप सोपल मुकबधिर निवासी विद्यालय या ठिकाणी सुरू आहे.
या शिबीरात ४० भंते यांनी दीक्षा घेण्यासाठी सहभाग नोंदवला. शिबीराची सुरुवात ही कीर्तीपाल गायकवाड सोलापुर, यू एफ जानराव यांच्या हस्ते हस्ते झाले. या शिबीरासाठी प्रमुख भंते कश्यप यांनी दिक्षा देवून मार्गदर्शन केले. तसेच धम्मपद मॉनेस्ट्री संस्थापक मा. श्री सुधाकर नगरे सर यांनी या शिबाराचे सुञसंचन केले. नालंदा स्तुप बुध्दीजम ट्रस्ट बार्शी यांचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी काही भोजनदातेनी भोजनदान देऊन श्रामनेर शिबिरास सहकार्य केले. व भंते कश्यप यांनी सर्वाना आर्शिवाद दिले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक