Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
मित्राला शेअर करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


पोलीस सेवा संघ हा गेल्या कित्येक वर्षापासून बार्शी शहर पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे तसेच नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. आजही 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त पोलीस सेवा संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी साहेब यांनी पोलीस सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच बार्शी शहर उप पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसाट साहेब यांनी देखील केलेल्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या आले त्यावेळी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बालाजी वळसने, तालुका पोलीस हवालदार केकान साहेब, सुभाष नगर चौकीचे पोलीस हवालदार भोंग साहेब, पोलीस नाईक सत्यवान जाधव यांनी सुद्धा रक्तदान केले.

मोठ्या प्रमाणात बार्शी शहर व बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार उपस्थित होते सर्व अंमलदार व बार्शी शहरातील नागरिकांनी पोलीस सेवा संघाला शुभेच्छा दिल्या.

हे रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी पोलीस सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व महिला टीम यांनी परिश्रम घेतले.

पोलीस सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश आणेराव, महाराष्ट्र सचिव समाधान विधाते महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवलिंग बुके, महाराष्ट्र सहसचिव सुप्रियाताई काशीद महाराष्ट्र खजिनदार दत्ता माने, महाराष्ट्र सदस्य अभिजीत माळी, संतोष दराडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष केतन धोका, बार्शी शहराध्यक्ष साईनाथ बागडे, बार्शी तालुका उपविभाग प्रमुख निशिकांत सुतार, संतोष चोबे, बालाजी काळे, समाधान राऊत, नागेश हिरेमठ, अजय जाधव, अभिषेक स्वामी, गणेश सातारकर, संदीप पवार, स्वप्निल पवार, रंणजीत देशमुख, नागेश लोहार, अशोक कांबळे, अनंत नेटके, औदुंबर जाधव, अमर खराडे, चंद्रकांत जाधव, प्रदीप इंगोले, राहुल मोहिते, पण सचिन मुंडे विशाल तोडकरी, विजय ढगे, रुपाली ताई विधाते, जयदेवी ताई काकडे, सुनीताताई मस्के, सारीका आणेराव, निताताई काजळे, अमृता आणेराव इत्यादी पोलीस सेवा संघ सर्व पदाधिकारी सदस्य महिला टीम उपस्थित होते.