सुर चेन्नई महामार्ग बाधित शेतकरी मोबदला खूपच कमी मिळणार असल्याने आता आक्रमक होताना दिसत आहेत
अक्कलकोट – ग्रीनफील्ड सुरत हैदराबाद चेन्नई रस्त्याचे गुणांक दोन प्रमाणे दर जाहीर करा अन्यथा जमीन अधिग्रहण करू देणार नाही असे आव्हान एका लेखी निवेदनाद्वारे स्वामीनाथ हरवाळकर यांनी वरिष्ठाकडे केली आहे.
ग्रीन फील्ड सुरत हैदराबाद चेन्नई हे द्रुतगती महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून तीन तालुक्यातून जात आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकूण ५९ गावातून हा रस्ता जाणार आहे. बार्शी,दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तीन तालुक्यातून सुमारे १८०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. अक्कलकोट दक्षिण सोलापूर येथील रस्त्याच्या कामाचा पूर्ण सर्वे झाला असून अद्याप जमिनीचे दर निश्चित नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी भयग्रस्त झालेले आहेत. अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मते विचारात घेऊन दर जाहीर करावे दर व प्रत्येक गावात ग्रीन फील्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्येक ग्रामपंचायत जमिनीचे दर घोषित करून त्याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मान्यता घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून आडवा तिडवा जात असल्याने दिसून येत आहे.त्यामुळे जमिनीचे त्रिकोणी, षटकोनी तुकडे होणार आहेत त्यामुळे जमीन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यापासून शिवार रस्त्यापर्यंत शिवारस्त्यापासून पाऊलवाटा, गाडीवाटा बंद होणार आहेत त्यामुळे तेथील शेती पडीक पडण्याचा धोका अधिक आहे.कमी दरामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अन्य ठिकाणी शेती विकत घेऊ शकत नाही त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्याचे संसार उध्वस्त होण्याचा धोका वाढलेला आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे गुणांक दोन नुसार, समृद्धी महामार्गा प्रमाणे शासनाने दर जाहीर करून जमीन अधिग्रहण करावे अन्यथा जमीन अधिग्रहणास सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वामीनाथ हरवाळकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ११ सोलापूर यांच्याकडे सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले
आहे.निवेदनाच्या प्रती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्यामार्फत देण्यात आले आहे.या वेळी तालुका किसान सभेचे अध्यक्ष दयानंद फताटे, मच्छिंद्र सुरवसे, अविनाश कदम, सिद्धाराम श्रीमंत बाके, नागनाथ रेऊर, रेवणसिद्ध बिराजदार राजकुमार, जवळगी सिद्राम मानशेट्टी, मल्लिनाथ चलगेरी, वजीर जमादार आदी शेतकरी उपस्थित होते.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ