बार्शी ( कव्हे ):- जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत तालुक्यातील कव्हे येथील श्री हनुमान विद्यामंदिरच्या विद्याथ्यर्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी तीन विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर माने व मुख्याध्यापक बिडवे यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये आरती जोतिराम शिंदे, संस्कृती मनोज लोकरे, स्वराली गुणवंत ठाकरे यांनी यश मिळविले. तिघींची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थिनींना योगशिक्षक ठोंबरे व फरताडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन