शहरातील शहिद स्मारक(अमर जवान) या ठिकाणी रणगाडा दाखल झाला असून आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
बाल चमूला प्रेरणादायी
बार्शी विधानसभा आमदार राजेंद्र राऊत यांनी काही शाळांची माहिती घेत विद्यार्थ्यांनी न पहिल्या असलेल्या संकल्पना समोर आल्या याचाच एक भाग म्हणजे बार्शी चा इतिहास व बार्शी तालुक्याचे स्वातंत्र्य लढा व मुक्ती संग्राम यातले योगदान याचा इतिहास पालक तसेच पाल्य यांना समजावा याकरिता बार्शी शहर व तत्कालीन तालुक्यात ईतिहास समोर येईल अशी संकल्पना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वृत्त विशेष
पुणे शहरातील खडकी येथील सि.ए.एफ.व्ही.डी लष्करी विभागाकडून पाकिस्तानला १९७१ चा युद्धात धुळ चाळणारा ४० टनी टि-५५ विजेता टॅंक रणगाडा बार्शी शहरातील शहिद स्मारक(अमर जवान) या ठिकाणी दाखल झाला असून आमदार राजेंद्र राऊत यांनी पाहणी केली.युद्धातील स्मृती जपण्यासाठी या रणगाड्याला शहिद स्मारक(अमर जवान) या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे..
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश