Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश तर, विभागीय 19 वर्षाखाली फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये श्वेता निळ तृतीय

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश तर, विभागीय 19 वर्षाखाली फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये श्वेता निळ तृतीय

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश तर, विभागीय 19 वर्षाखाली फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये श्वेता निळ तृतीय
मित्राला शेअर करा

दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाचे 19 वर्षाखालील मुले व मुली यांनी खालील प्रमाणे यश संपादन केले.

यामध्ये
1) कुमारी सई शिराळकर 12 वी शास्त्र हिने 100 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात प्रथम क्रमांक.
200 मीटर फ्रीस्टाइल मध्ये प्रथम क्रमांक
50 मीटर बॅकस्ट्रो मध्ये प्रथम क्रमांक तसेच
2) व्यंकटेश जाधव 11 वी कला याने 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक.
50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक
400 मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक
3) धीरज नवले 11 वी शास्त्र 100 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक.
4) अनिकेत वासकर 11 वी किमान कौशल्य 100 मीटर फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक.
व 50 मीटर बॅक स्ट्रोक तृतीय क्रमांक.
5) प्रथमेश बारंगुळे 12 वी शास्त्र याने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तृतीय क्रमांक व 100 मीटर फ्री स्टाईल मध्ये तृतीय क्रमांक मिळवला
6) व त्याचबरोबर 19 वर्षाखालील मुलांच्या 4 बाय100 रिले मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

तर भाळवणी तालुका पारनेर येथे पुणे विभागीय 19 वर्षाखाली फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाची श्वेता निळ हिने तृतीय क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

वरील सर्व खेळाडूंना प्राध्यापक संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.