दि.30 /09 /2024 रोजी हॉटेल रामकृष्ण एक्झिक्यूटिव्ह येथे लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के. डी. मॅडम यांना ‘राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन्स राहुल दोशी होते व प्रमुख पाहुणे लायन डॉ.शरद पाटील हे होते. यावेळी लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा लायन्स वर्षा खांडवीकर, सचिव लायन्स अमृता मॅडम व सर्व क्लब मेंबर उपस्थित होते.
लायन्स क्लब बार्शी यांच्याकडून राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य, संस्था सदस्य, शालेय समितीचे चेअरमन व सर्व शाळा समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ