उस्मानाबाद शहरालगत हातलाई देवीच्या डोंगरावर प्राचीन अशी सातवाहनकालीन वसाहती आढळून आली तसेच सातवाहन राजा पुळुमावी याचे इ. स. पहिल्या शतकातील नाणे देखील इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांना सापडले होते.

या सापडलेल्या वसाहतीचे महत्व जाणून मराठवाडा पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक श्री.अजित खंदारे साहेब यांनी हातलाई डोंगरावरील या प्राचीन वसाहत स्थळाची पाहणी करून हा भाग संरक्षित करण्यासाठी वन खात्याशी पत्र व्यवहार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी त्यांच्या सोबत इतिहास व पुरातत्व अभ्यासक श्री.जयराज खोचरे हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी इथे ओपन म्युझियम व साईट म्युझियम व्हावे यासाठी हि इच्छा व्यक्त केली. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकाला व भक्तांना प्राचीन काळातील वसाहत, विटा, खापरे असा अनेक दुर्मिळ ठेवा पाहता येईल यामुळे इथे म्युझियम व्हावे अशी मागणी केली.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर