Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
मित्राला शेअर करा

14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून संबंध देशांमध्ये साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र विद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय के. डी. धावणे मॅडम उपस्थित होत्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सपताळे सर हे उपस्थित होते.

या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा धावणे मॅडम यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने हिंदी भाषेमध्ये सुसंवाद साधला पाहिजे असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक महामुनी सर पर्यवेक्षिका साठे मॅडम उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक श्रीमती वायकुळे मॅडम,श्री मदने सर, श्री माने सर, श्रीमती शिंदे मॅडम, वाघमारे मॅडम, चौधरी मॅडम व कांदडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रगती वीर व श्रद्धा महात्मे यांनी केले तर कार्यक्रमाचा गोड म्हणजेच आभार कुमारी आरती बरडे हिने मानले.