बार्शीपुत्र IAS अधिकारी रमेश घोलप यांच्याकडे झारखंडच्या आरोग्य विभागातील महत्त्वपूर्ण जबाबदारी
राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन चे झारखंड राज्याचे मिशन डायरेक्टर म्हणून सरकार ने केली नियुक्ती
बार्शी तालुक्यातील महागाव चे सुपुत्र असलेले आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी कोरोना काळात झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते. त्यांनी कोविड व्यवस्थापनात केलेल्या कार्याचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री, मा.स्वास्थ्य मंत्री, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी कौतुक केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राज्याच्या आरोग्य विभागातील अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन चे झारखंड राज्याचे मिशन डायरेक्टर म्हणून जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची संभावना लक्षात घेता राज्यात प्रभावी उपाययोजना करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. शिवाय झारखंड सारख्या राज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्य योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
सध्या आयएएस रमेश घोलप हे झारखंड राज्याच्या कृषी व पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते शिवाय त्यांच्याकडे झारखंड राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक पदाचा अतिरिक्त पदभार होता.
IAS अधिकारी रमेश घोलप यांची राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन चे झारखंड राज्याचे मिशन डायरेक्टर या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या बार्शी शहर व तालुक्यातील मित्रपरिवार व चाहत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान