Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थीनींची एकांकी नाटकाव्दारे जनजागृती

छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थीनींची एकांकी नाटकाव्दारे जनजागृती

मित्राला शेअर करा

वाशी : – तालुका विधी सेवा समिती वाशी व विधिज्ञ मंडळ , वाशी यांचे संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव ॲक्शन प्लॅन २०२१-२०२२ अंतर्गत दि .२७ / १० / २०२ रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर एकांकी नाटक छञपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थीनींनी सादर केले .

बेटी बचाओ बेटी पढाओ या एकांकी नाटकात कु . प्रियंका कावळे , कु . अनुष्का देशपांडे , कु . प्रियंका जगताप , कु . श्रावणी कवडे , कु . धनश्री करडे , कु . अंकिता चोळसे , कु.समृध्दी मोहिते या विद्यार्थीनीनी सहभाग घेतला .

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस . व्ही . गाढवे ( चेडे ) , श्री पी.जे. देशमुख ( विधिज्ञ ) , श्री एस.एन. कावळे ( विधिज्ञ ) , श्रीमती एस . आर . देशमुख ( विधिज्ञ ) व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते . बेटी बचाओ बेटी पढाओ हे एकांकी नाटक सादर करण्यासाठी विद्यालयातील श्रीमती बावकर एस.बी. , श्रीमती मुळे टी.सी. , श्रीमती ठाकर जे . के . व श्रीमती माने पी . एच . यांनी मार्गदर्शन केले . सदरील एकांकी नाटकाबाबतची माहिती श्री बी.डी. कांबळे यांनी सांगितली तर एकांकी नाटकाचे संचलन श्री . एस . बी . छबिले यांनी केले . एकांकी नाटक यशस्वीपणे सादर करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .