जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या रोटरी क्लब बार्शी यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे.येथील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे हे होते .तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री विक्रम सावळे सर हे होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व चेअरमन क्रेडिट सोसायटी प्रा.डी.एम.मोहिते, शाला समिती संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे चे चेअरमन श्री.बी.के. भालके.सर,श्री. कौशिक बंडेवार ,श्री शैलेश वाखारिया ,श्री मल्लिनाथ धारूरकर ,श्री डोईफोडे सर श्री चंद्रकांत खुणे, श्री गोविंद बाफना, श्री गाढवे सर, श्री दळवी सर मुख्याध्यापक संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे ,श्री विलास शिराळ सर (केंद्रप्रमुख भातंबरे) श्री अमित खटोड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
प्रशालेतील आजूबाजूच्या खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माळवदकर सर तर आभार प्रदर्शन श्री माने आर आर यांनी केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर