लातूर-हडपसर (पुणे)-लातूर दिवाळी स्पेशल ट्रेन येत्या शुक्रवारी, दिनांक 25-10-2024 पासून ते 11-11-2024 पर्यंत, प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी, दिवाळी सणातील दहा दिवस सकाळी 9:30 वाजता लातूर स्टेशनवरून आपल्या सेवेत दाखल होणार आहे.

ही ट्रेन हडपसरला दुपारी 3:30 वाजता पोहोचेल. तसेच हडपसर पुणे वरून ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी 4:05 वाजता प्रस्थान करणार आहे आणि लातूर स्टेशनला रात्री 9:20 वाजता पोहोचेल.
लगेच रात्री 10:35 वाजता ही ट्रेन मुंबईला जाण्यासाठी तयार असेल.
तरी दिवाळीमध्ये या ट्रेनला भरघोस प्रतिसाद द्यावा, जेणेकरून ही इंटरसिटी ट्रेन प्रमाणे नियमित होईल.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर