बार्शी तालुक्यातील प्रलंबित भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या ऑफिस मध्ये घालावे लागणारे हेलपाटे व जमिनीचा मोबदला मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी उप विभागीय अधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता व शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.

सदर बैठकीत शेतकऱ्यांनी सांगितलेल्या तक्रारींची व अडचणीचे त्वरित निवारण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ राऊत यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या व सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून प्रकरणे मार्गी लावण्यास व प्रत्येक महिन्यात भूसंपादन बाबत आढावा बैठक घेण्यात येईल अशा सूचना दिल्या.
पाझर तलावा साठी संपादित जमिनीची १९७२ पासून रखडलेली प्रकरणे त्वरित मार्गी लावून लवकरच त्याचा मोबदला वाटप करण्यात येईल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले, यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१९७२ पासून रखडलेली प्रकरणे त्वरित मार्गी लागून त्याचा मोबदला वाटप करण्यात आल्यास बाधित शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ठरणार आहे.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ