Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > बार्शी येथे कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण शिबीर

बार्शी येथे कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण शिबीर

बार्शी येथे कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण शिबीर
मित्राला शेअर करा

सन 2023-24 मध्ये केंद्र पुरस्कृत ॲस्कॅड योजनेअंतर्गत अँटी रेबीज लसीकरण शिबीर मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र पुरस्कृत ॲस्कॅड योजना सन 2023-24 अंतर्गत जागतिक रेबीज दिनानिमित्त ” रेबीज लसीकरण शिबीर” दि. 27.09.2023 रोजी बुधवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत तालुका लघु पशुवैदयकीय सर्वचिकित्सालय, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरात बार्शी शहरातील सर्व कुत्र्यांना अँटीरेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण शिबिराची सर्व श्वान पालकांनी नोंद घेऊन आपल्या श्वानाचे अँटीरेबीज लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

बार्शी येथील तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय बार्शी, जिल्हा सोलापूर ( Taluka Mini Veterinary Polyclinic, Barshi )
येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.