Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मित्राला शेअर करा

श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी, येथे सकाळी 9 वाजता हॉल नं. 14 मध्ये श्री. पवार व्ही. जी. यांचे अध्यतेखाली संपन्न झाली. प्रमुख पाहुणे मा. डॉ. यादव बी. वाय. व मा. शितोळे बापू उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी संस्थेचा वार्षिक कामकाज आढावा, जमाखर्च, अंदाजपत्रक, आरोग्य शिबीर, सहल, ईतर कामकाज ठराव मंजूर करण्यात आले राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. दिलीप कराड, श्री बागवान व 75 वर्षावरील सभासदांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. व्हि. जे. देशमुख यांनी केले. सभेचा अडावा व सभेचा अजेंडा तसेच या अनुषंगाने सामाजिक उपक्रमांची, शैक्षणिक कार्याचा आढावा सचिव श्री. डि. बी. पाटील सर यांनी सांगितला वार्षिक कामकाजाचा आढावा, जमाखर्च, अंदाजपत्रक जेष्ठ नागरिकांसाठी असणार्‍या लाभाच्या योजनांची माहिती श्री. टी. एस. मोरे सर यांनी सागितल्या श्री. शिंदे, पाटील, खपाले गव्हाणे या सभासदांनी मनोगते व सूचना मांडल्या.

सूत्रसंचालन आभार प्रदर्शन श्री. बदे सर यांनी केले. सभा व कार्यक्रमासाठी सेवाभावी संस्थेचे गायकवाड आर. व्ही. धोत्रे सर, जेवे सर, डॉ. कराड सर व आगलावे एन.बी व ईतर पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.