सोलापूर, दि. 29 :- शेतकरी हा अन्नदाता आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे खूप आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः ची उन्नती साधावी. त्यांना संबंधितानी सर्वतोपरी मदत करावी, असे प्रतिपादन केंद्रीयरा सायनिक आणि खते, नवीन अक्षय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज येथे केले.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त श्री सिध्देश्वर देवस्थान, कृषि विभाग, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 व्याश्री सिध्देश्वर कृषि प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
होम मैदान येथे आयोजित या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, इंडीचे आमदार यशवंत गौडापाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे, निवृत्त कृषि अधिकारी श्री. बरबडे, शेतकरी व नागरिक उपस्थित होते. कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याबद्दल समाधान व्यक्त करून केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले, मी स्वत: शेतकरी नाही. पण मला शेतीची खूप आवड आहे. माझ्या मतदार संघामधील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांचा लाभ मी स्वत: लक्ष देवून मिळवून दिला आहे.
कोणतेही पीक घेताना त्या पिकावरील होणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी आधीच करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. केंद्राने व प्रत्येक राज्याने शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना राबविल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावले पाहिजे, असे ते म्हणाले.
कृषि प्रदर्शनामध्ये मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केला पाहिजे. शेतकऱ्यांनी रोज किमान अर्धा तास तरी कृषि विषयक टीव्ही वाहिन्यासुध्दा पाहिल्या पाहिजेत. हे कृषिप्रदर्शन खूप चांगले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, असाविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सिध्दश्वर देवस्थानकमिटीने कृषि प्रदर्शनाचा खूप चांगला व शेतकऱ्यांच्या फायद्याचा उपक्रम राबविला आहे. या कृषि प्रदर्शनामध्ये जे काही मार्गदर्शन मिळेल, त्यावर विचार करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय बदल करता येतील, शेती उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल शेतकऱ्यांना मदत होईल. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या प्रदर्शनाबद्दल उपस्थितांना माहिती देवून प्रदर्शनाचा उद्देश सांगितला.
प्रदर्शना निमित्त भव्य शामियाना उभारण्यात आला असून, 200 पेक्षा अधिकदालने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतीपूरक औजारे, प्रगत तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, दुर्मिळदेशी बियाणे, ट्रॅक्टर आदि शेती संबंधित दालनांचा समावेश आहे. 2 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनाचा शेतकरीव नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान