Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकात घडवले मराठी संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकात घडवले मराठी संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकात घडवले मराठी संस्कृतीचे दर्शन
मित्राला शेअर करा

कर्नाटकातील इंटरनॅशनल सांस्कृतिक जांबोरीत सहभागी महाराष्ट्र विद्यालय विद्यार्थी-विद्यार्थीनी. सिद्धी चव्हाण, आरती बरडे, सुरवसे वैष्णवी ,रुपाली लोखंडे, कात्रे अक्षरा, धनश्री लावंड, वेदांजली परबत, इश्वरी तांबारे, मधुरा गुळवे, पुरुराज पाटील, अथर्व बिडकर, मयुरेश लटके, अजय वैद्य, संस्कार गादेकर, समर्थ गुरव, प्रथमेश अवारी, यश इंगळे, वेंकटेश शेवकर.

दक्षिण कर्नाटकातील मुडबिदरे येथील अल्वा इन्स्टिट्युट येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरीत बार्शीतील महाराष्ट्र विद्यालय बार्शी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रा संघात सहभागी झाले . विद्यार्थ्यांनी नृत्यातून, वेशभूषा तून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भारतदेशाला दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक, गोंधळी, दिंडी. आणि शौर्याचे उत्कृष्टरीत्या सादरीकरण केले.

भारत सरकारच्या द भारत अँड गाईडस् च्या वतीने स्काऊट आणि गाईडस् यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विद्यालय प्रशालेने महाराष्ट्र राज्याचे दर्शन करत उत्कृष्ट संचलन सादर केले.

बार्शी विद्यार्थ्यांचा या प्रकारातही सहभागी

प्रशालेच्या स्काऊड आणि गाईड्स यांनी कृषी मेला, विज्ञान प्रदर्शन, चॅलेंज व्हॅली, साहस कॅम्प, जंगल सफरी, सायन्स मेला, फन बेसेस, मॅजिक शो, बीच वॉक, कला प्रदर्शन, एक भारत श्रेष्ठ भारत, स्वदेश मेला, फ्लॉवर शो, बुक मेला, सायन्स स्किल, हैक वॉक जैन मंदिर, स्वच्छ मुडबिदरे, फूड मेला या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व उपक्रमांसाठी प्रशालेचे स्काऊट मास्टर योगेश उपळकर आणि सोलापूरचे गाईड कॅप्टन राजश्री वाघमारे तसेच क्रीडा शिक्षक श्री.अनिल पाटील, श्री. पी. डी पाटील, श्री.योगेश उपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले