बार्शी शहरातील मध्यवर्ती भागातील जवाहर कंपाऊंड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, शिवस्मारकाचा अनावरण सोहळा डिसेंबर अखेरपर्यंत होणार आहे.
या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आकारण्यात आली असून या शिवस्मारका मुळे बार्शीच्या वैभवामध्ये भर पडणार आहे.
या स्मारकामध्ये राज-विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 18 लाख रुपयांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देण्यात आला आहे. या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, स्मारकाची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक