बार्शी, येथील ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी संचलित, विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या तब्बल 9 खेळाडूंची व्हिएतनाम येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 39 व्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेमध्ये स्पीड रेस व रीले रेस प्रकारामध्ये पृथ्वीराज कदम – गोल्ड मेडल, पृथ्वीराज जाधव – गोल्ड मेडल, सर्वेश कवडे – गोल्ड मेडल, काव्यांजली वायचळ – गोल्ड मेडल, अनुष्का हसरे – गोल्ड मेडल, अर्णव हसरे – गोल्ड मेडल, राजनंदिनी जाधवर – सिल्वर मेडल, पवन सरकाळे – गोल्ड मेडल, वैश्नवी कापसे – सिल्व्हर मेडल मिळवत बार्शी तिथं सरशी ही म्हण सिद्ध करत स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लबचा दबदबा कायम ठेवला आहे.
विजयी खेळाडूंच्या माध्यमातून बार्शीच्या शरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या यशाबद्दल बार्शी शहर व तालुक्यातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सर्व खेळाडूंना बार्शी सारख्या शहरात स्केटिंगचे खेळाडू घडवणारे प्रशिक्षक गणेश रोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तर यशस्वी खेळाडूंचे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष भगवान जाधव, सचिव सविता जाधव यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
बॅडमिंटन स्पर्धेत बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीचा संघ प्रथम