Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वर्धापनदिनी विमा रॅली

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वर्धापनदिनी विमा रॅली

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वर्धापनदिनी विमा रॅली
मित्राला शेअर करा

बार्शी :- भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) या संस्थेचा १ सप्टेंबर २०२२ रोजी ६७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कर्मचारी व विमा प्रतिनिधी यांनी एकत्रित येत भव्य विमा रॅलीचे आयोजन केले.

रॅलीची सुरुवात शहरातील बार्शी नगर परिषद समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरु होऊन विमा रॅली सुभाष नगर येथील मुख्य ऑफिस येथे समारोप झाला.

रॅलीचे उदघाटन भारतीय आयुर्विमा महामंडळ, बार्शी शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी तुषार घाटगे यांच्या हस्ते व सांगता शाखेचे वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शाखेचे विकास अधिकारी उन्मेष पोतदार बोलताना म्हणाले की अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे विमा ही सर्वांची मूलभूत आर्थिक गरज आहे आणि विमा जनजागृती हाच या रॅली मागचा उद्देश आहे. रॅली मध्ये महिला विमा एजंट देखील बहुसंख्येने सामील होऊन घोषणा देत सहभागी झाल्या होत्या. विमा रॅली यशस्वीतेसाठी विमा प्रतिनिधी मारुती मोरे व सौ. कीर्ती कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.