Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये

भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये

दोन वर्षांच्या देवदानच्या उपचारासाठी 'रे ऑफ होप' या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून 28.7 लाख सिंगापूर डॉलर्स म्हणजेच 16 कोटी रुपये दान केले
मित्राला शेअर करा

सिंगापूर : देवदान देवराज (Devdan Devraj) हा भारतीय वंशाचा बालक दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होता. सिंगापूर (Singapore) मधील लोकांकडून मिळालेल्या देणगीतून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

भारतीय वंशाच्या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या उपचारासाठी सिंगापूरमध्ये (Singapore) 16 कोटी रुपये जमा करण्यात आले. देवदान देवराज हे भारतीय वंशाचे देव देवराज आणि त्यांची चिनी वंशीय पत्नी शु वेन देवराज यांचे एकुलते एक अपत्य आहे. देवदानवर उपचार करताना 16 कोटी रुपये खर्चून जीन थेरपी (Gene Therapeutic) झोलजेन्स्मा (Zolgensma) वापरली गेली. ही जगातील सर्वात महागड्या पद्धतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. बुधवारी एका मीडिया रिपोर्टनुसार मुलाची आई जू वेन देवराज यांनी सांगितले की, ”एक वर्षापूर्वीपर्यंत मी आणि माझे पती आमच्या मुलाला चालताना पाहू शकत नव्हतो. त्यावेळी त्याला उभेही राहता येत नव्हते. आता त्याला चालताना पाहणे शक्य झाले आहे.”

जमलेल्या या पैशातून त्याच्यावर उपचार करण्यात आले. भारतीय वंशाच्या दोन वर्षांच्या मुलाला दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर (Neuromuscular Disease) आजाराने ग्रासले होते. सिंगापूरमधील नागरिकांकडून मिळालेल्या सुमारे 16 कोटींच्या देणगीच्या रकमेतून उपचार मिळाल्यानंतर आता तो चालू शकतोय. अत्यंत दुर्मिळ मज्जासंस्थेच्या आजाराने ग्रासलेल्या मुलाचे नाव देवदान देवराज (Devdan Devaraj) आहे. न्यूरोमस्क्युलर रोगावर उपचार करणे खूप महाग आहे, परंतु सिंगापूरच्या नागरिकांच्या मदतीनंतर या मुलावर उपचार करणे शक्य झाले.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवघ्या 10 दिवसांत सुमारे 30,000 लोकांनी दोन वर्षांच्या देवदानच्या उपचारासाठी ‘रे ऑफ होप’ या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून एकूण 28.7 लाख सिंगापूर डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 कोटी रुपये दान केले. जेव्हा देवदान एक महिन्याचा होता, तेव्हा त्याला स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी आजाराचे निदान झाले, या आजारामुळे स्नायू कमकुवत होते. कालांतराने त्यांची प्रकृती बिघडली. दान केलेल्या मोठ्या रकमेच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले असून आता तो थोडासा चालण्यास सक्षम आहे. देवदानला चालताना पाहून त्याच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.