Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > इंडियन रेडक्रॉस सोसायटी बधिर मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप

इंडियन रेडक्रॉस सोसायटी बधिर मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप

मित्राला शेअर करा

अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई यांच्या सहकार्याने श्रवणयंत्र वाटप कर्णबधिर शाळेत कान तपासणी व श्रवणयंत्र वाटप शिबिर

इंडियन रेडक्रॉस सोसायटी बधिर मुक विद्यालयातील विद्यार्थासाठी अलि यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई यांच्या सहकार्याने कान तपासणी व श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उदघाटन समारंभ दि. 26/10/2021 रोजी 10:30 वाजता विद्यालयात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव जायपत्रे पोलीस निरीक्षक बार्शी श्री. किशोर अंधारे कृषी अधिकारी बार्शी तसेच मुंबईतील अली यावर जंग संस्थेतील श्री डॉक्टर आर पी शर्मा डॉक्टर मॅथ्यू मारटीन श्री.गोपाल शर्मा श्री.अरविंद सरवडे श्री.बालाजी शिंदे श्री.डॉक्टर संजय खंडागळे हे उपस्थित होते तसेच व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ए.बी. कुलकर्णी सचिव श्री.लड्डा संचालक श्री.प्रतापराव जगदाळे ,डॉक्टर तरंग शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्णबधिरांचे आद्यगुरू डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमे च्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबिरात 90 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुहासिनी शिरसागर यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत मुळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय श्री.अमोल गवारे यांनी केला आभार प्रदर्शन सौ. सुषमा जाधव यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.