Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कर्मवीर जयंती निमित्त आयोजित आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनात जिजामाता विद्यामंदिर बार्शीच्या मुलींचे उज्ज्वल यश

कर्मवीर जयंती निमित्त आयोजित आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनात जिजामाता विद्यामंदिर बार्शीच्या मुलींचे उज्ज्वल यश

कर्मवीर जयंती निमित्त आयोजित आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनात जिजामाता विद्यामंदिर बार्शीच्या मुलींचे उज्ज्वल यश
मित्राला शेअर करा

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 121 व्या जयंती निमित्त, डॉ. मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये जिजामाता विद्यामंदिर बार्शीच्या प्राथमिक गटात (इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी) च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता 4 थी च्या कु. शुभ्रा माने व कु. प्रांजल मोरे यांचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, पार्यवेक्षक संजय पाटील, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी. पांडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व पालक यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.