सोलापूर, दि. 30 : जिल्ह्यासाठी मृग बहारामध्ये डाळिंब, लिंबू, मोसंबी, पेरु, चिक्कू व सिताफळ फळपिके अधिसुचित करण्यात आली आहेत. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

पुनर्रचितमध्ये डाळिंब व सिताफळ या पिकांची फळपिक विमा भरण्याची मुदत अनुक्रमे 15 जुलै व 31 जुलै 2022 पर्यंत आहे. मुदतीत शेतकरी बांधवांनी पीक विमा भरावा. 1 जुलै ते 7 जुलै 2022 या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इंडिया @ 75 मोहिमेअंतर्गत तिसरा पीक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेसाठी शेतकरी मेळावे व शेतकरी विमा पाठशाळा कार्यक्रमांचे आयोजन तालुका व ग्रामपातळीवर करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन