Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > एलआयसी आयपीओ च्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

एलआयसी आयपीओ च्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

देशातील सर्वात मोठी व विश्वसनीय विमा कंपनी असलेल्या एलआयसी च्या (Life Insurance Corporation of India-LIC) आयपीओची प्राईस ठरली
मित्राला शेअर करा

देशातील सर्वात मोठी व विश्वसनीय विमा कंपनी असलेल्या एलआयसी च्या (Life Insurance Corporation of India-LIC) आयपीओची प्राईस ठरली आहे.

बर्‍याच दिवसापासून चर्चेत असणारा lic ipo
आयपीओ बाजारात 4 मे ते 9 मे या कालावधीत येणार असून त्याची किंमत ही प्रति शेअर 902 ते 949 इतकी असणार असल्याची माहिती आहे.

जे पूर्वीपासून एलआयसी पॉलिसीधारक आहेत त्यांना आयपीओच्या किंमतीवर 60 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. एबीपी लाईव्हच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के शेअर बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर 60 रुपये तर कर्मचारी आणि रिटेल गुंतवणूकदारांना 45 रुपयांची सूट मिळणार आहे.

एलआयसीने या आधी फेब्रुवारीमध्ये यासंबंधीचा ड्राफ्ट सेबीकडे जमा केला होता. एलआयसीच्या बोर्डने 23 एप्रिलला या गोष्टीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे कंपनीच भागभांडवल हे सहा लाख कोटी रुपये इतकं होणार आहे. आता एलआयसीच्या या आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभं करण्यात येणार आहेत.

एलआयसीचे व्यवस्थापन आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडून देशभरात सहा मोठ्या शहरांमध्ये रोडशो आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, राजकोट आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील गुंतवणूकदारांशीही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे.