“जाण समाजाची, जाण निसार्गाची” या उद्देशाने स्थापन झालेल्या जाणीव फाउंडेशनचा २ रा वर्धापन दिन कार्यक्रम वैकुंठधाम, बार्शी येथे संपन्न झाला या कार्यक्रमास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होतो.
याप्रसंगी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जाणीव फाऊंडेशनचे समजासाठीचे सामाजिक कार्य आणि विविध सामाजिक उपक्रम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी हे वेल्डिंग दुकानदार, टेम्पो ड्रायव्हर, हॉटेल चालक, टपरी चालक असे छोटे – छोटे हातावर पोट असणारे व्यवसायिक असून देखील केवळ मनामध्ये असणारी समाजाविषयीची बांधिलकी आणि समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करण्याची जिद्द केवळ या साठीच ही सर्व टीम जीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन करते.
खऱ्या अर्थाने जीवन फाऊंडेशनचा हा उपक्रम आपल्या निश्चितच अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि तितकाच प्रेरणादायी असून आपण सर्वांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कार्य करावे असे सांगून फाऊंडेशन आणि फाऊंडेशनच्या सर्व टीम ला ओमराजे यांनी उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. रमेश पाटील, बार्शी तालुका क्रीडा असोशियनचे अध्यक्ष श्री. किरण देशमुख, अध्यक्ष श्री. तुळशीदास मस्के, उपाध्यक्ष श्री. वसंत मामा हवालदार, खजिनदार श्री. पवन खरसडे, तज्ञ संचालक श्री. अनंत मस्के, श्री. नानासाहेब मारकड, श्री.किरण लुंगारे, श्री. अप्पासाहेब साळुंके, श्री.राजेंद्र नवगण, श्री.संपतराव देशमुख, श्री. संतोष पवार, श्री. पृथ्वीराज भैय्या बाफना, उडान फाऊंडेशनचे श्री. इरफान भाई, जय शिवराय प्रतिष्ठानचे श्री. विजय दादा राऊत, सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रीमती. मिताली ताई गरड, श्री. शिवराज धावारे, सोन्या मारुती प्रतिष्ठानचे श्री. रवी राऊत, बागवान सोशल फाउंडेशनचे श्री.जुबेर भाई बागवान यांच्यासह नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद